भुसावळातील अमानूष घटनेचा निषेध ; तहसीलदार कार्यालयावर सविधान आर्मी महिला आघाडी तर्फे आक्रोश मोर्चा ;

भुसावळ – येथिल अल्पवयींन मुलीवर जन्मदात्यानेच अत्याचार केल्याची घृणास्पद व निदनीय नात्याला काळीमा फासणारी घटना येथे उघडकिस आली . या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे .

या नराधम बापा ने अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे बलात्कार केला या विकृत राक्षसास ज़ाहिर फ़ाशी द्या या मागणी साठी येथील सविधान आर्मी महिला आघाड़ीच्या वतीने
महिलाचां सोमवारी २५ रोजी दुपारी 2 वाजता महात्मा गांधी पूतळा ते तहसीलदार कार्यलयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे .
मोर्चाचे नेतृत्व सविधान आर्मी महिला आघाड़ी प्रदेश अध्यक्षा ,पीआरपी व रमाई ब्रिगेड ज़िल्हा महिला आघाड़ी प्रमुख ,माज़ी प.स.सदस्या तथा नगरसेविका पुष्पाताई जगन सोनवणे, सविधान आर्मी महिला आघाड़ी ज़िल्हा प्रमुख संगीता मोरे हे करतील .