भुसावळ – तालुक्यातील युवा कार्यकर्ते प्रा.धिरज पाटील यांची अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय लेवा विकास महासंघ संस्थापक केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे, युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके यांनी निवडीचे तसे पत्र दिले. डॉ.स्नेहल फेगडे, अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव भोळे, युवक शहराध्यक्ष स्वप्निल रडे, युवराज पाटील, तेजस भंगाळे उपस्थित होते.
प्रा.धिरज पाटील हे भुसावळ परिसरातील एक अभ्यासू, आक्रमक, आणि विश्वासू युवा नेतृत्व म्हणून प्रचलित आहेत. राजकारण आणि समाजकारणात ते सक्रिय असून शेतकरी, युवक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि महिला यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवुन दिला आहे. समाजातील अनेक तरुणांना ते योग्य दिशा दाखवतील याची खात्री आहे म्हणून त्यांची निवड केली आहे असे केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

सर्वच समाजातील युवकांना संघटित करून असंख्य युवक कार्यकर्त्यांची एक फळी तयार करणार आहे. समाजातील थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या युवकांना स्वावलंबी बनवन्याच्या उद्देशाने एक वेगळी दिशा देऊन प्रगतीची नवीन वाट निर्माण करून देण्याचा प्रयत्न करू असे प्रा.धिरज पाटील म्हणाले.


