भुसावळ – येथील साईनिर्मल फाउंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 71 व्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात 17 सप्टेंबरला जन्मलेल्या सर्व कन्या रत्नांचा व त्यांच्या पालकांचा बेबी किट पुष्पगुच्छ व जिलेबी वाटून यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्वीचा काळी मुलीचा जन्म झाला की जेष्ठ लोक नाक मुरडतात. तिचा जन्म म्हणजे अपशकुन समजत होते.मुलगा वंशाचा दिवा असे सांगून आता जिलेबी नको तर पेढे वाटा असे सांगत असतात. आजच्या काळात मुलीच खऱ्या आधार आहेत आणि दीपस्तंभा सारख्या आहे असे अनेकांनी समजून न घेतल्याने ते आजही मुलींना दुय्यम स्थान देत असतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात मध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभियानामुळे आजच्या काळात मुलींना समाजामध्ये मानाचं स्थान प्राप्त होत आहे. कन्यारत्नाचा जन्माचं सर्व स्तरांमधून आता फार मोठ्या प्रमाणात सहामध्ये जल्लोषात स्वागत केला जात आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र वाढदिवसानिमित्त साई निर्मल फाउंडेशन भुसावळच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर रोजी जन्माला आलेल्या कन्या रत्नांचा व त्यांच्या पालकांचा बेबी किट गुलाब पुष्प जिलेबी वाटून यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे, संस्थेचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, सह प्रकल्प प्रमुख ऍड.सागर सरोदे, भुसावळ नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किर्ती फलटणकर, भा. ज पा. जळगांव जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, समाजसेवक लक्ष्मणराव सोयंके, शंकर राव शेळके, डॉक्टर तळेले,सिंधी समाजाचे दिनेश दुधानी, सचदेव, आरोग्यसेविका चित्ते मॅडम, राधिका पाटील, तसेच तेथील लिपिक प्रशांत कुलकर्णी, साई सरोदे उपस्थित होते. साई निर्मल फाऊंडेशनचा हा उपक्रम आगळावेगळा असून कौतुकास पात्र असून समाजाने या संस्थेचा या उपक्रमाचा आदर्श घ्यावा. व स्त्री जन्माचं सर्वांनी जल्लोषात स्वागत करून आदरणीय पंतप्रधानांच्या बेटी बचाव बेटी पढाव हि चळवळ प्रगल्भ करावी असे आपल्या मनोगतातून याप्रसंगी डॉक्टर कीर्ती फलटणकर यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रशेखर पाटील यांनी तर सूत्रसंचालन ऍड.सागर सरोदे यांनी केले.


