भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल महाव्यवस्थापक शिल्ड प्राप्त ; सर्वाधिक शिल्ड भुसावळ विभागाला :

भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल महाव्यवस्थापक  शिल्ड प्राप्त ; सर्वाधिक शिल्ड भुसावळ विभागाला :
भुसावळ –
 मध्य रेल्वेचा 66 वा क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळा निमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल भुसावळ विभागाला 5 शिल्ड प्राप्त  झाल्या आहे . सदर शिल्ड एस एस केडिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक  यांनी अनिल लाहोटी महाव्यवस्थापक यांच्या हस्ते स्वीकारले. या शिल्ड वाणिज्य विभाग ,परिचालन विभाग,कार्मिक विभाग,सर्वश्रेष्ठ कार्यकुशलता ,भंडार विभाग या विभागांना शिल्ड प्राप्त झाल्या आहे दिनांक १७.०९.२०२१ ला शिल्ड प्राप्त झाल्या

याप्रसंगी एस एस केडिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक , एन डी गांगुर्डे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, आर के शर्मा वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, अरुण कुमार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक याप्रसंगी मुख्यालय येथे उपस्थित होते.