सावदा : नारायण राणे वर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सावदा शिवसेनेच्या वतीने सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना गलिच्छ व अपशब्द वापरल्या कारणाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी याबाबतचे मागणी मंगळवार रोजी पोलीस ठाण्यात जाऊन करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी शहर प्रमुख सुरेश परदेशी भरत नेते शहर संघटक शरद भारंबे निलेश खाचणे माजी नगरसेवक शाम पाटील गणेश माळी,मनीष भंगाळे,चेतन माळी, इरफान भाई, हुसेन खान, नाजिम इत्यादी उपस्थित होते.



