जळगावात शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध ;

जळगाव : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद उमटत असून जळगाव महानगर शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला.

राज्यामध्ये सर्वत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केले जाताहेत. नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सुद्धा राज्यांमधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून जळगावात देखील याची गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

राज्‍यात नारायण राणे यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध नोंदविला जात असून, ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. त्‍यानुसार शिवसेना जळगाव महानगरच्‍यावतीने शहरातील टावर चौकात आंदोलन करण्यात आले. येथे शिवसैनिकांनी डुक्‍कर आणत त्‍यास नारायण राणे यांच्‍यासह त्‍यांच्‍या मुलांच्‍या प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला. राणे यांचे राजकारण हे डुक्‍करांप्रमाणे गलिच्‍छ असल्‍याचे यातून दाखविण्यात आल्‍याचे गजानन मालपुरे यांनी यावेळी सांगितले.