जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला असून गेल्या 24 तासात 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 575 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 686 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 86 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.



