रावेर : मालवाहू वाहनाला झालेल्या अपघातात जळगाव शहरातील दोघे भाविक जागीच ठार झाले तर आठ जण जखमी झाले. मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाचे दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला

जळगावच्या कांचननगर भागातील काही जण (एम.एच.19 सी.वाय.5315) या मालवाहू वाहनाने मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून रात्री परत येत असतांना पालजवळ सुमारे अकराच्या सुमारास वाहन झाडावर धडकल्यानंतर उलटले. या अपघातात प्रशांत साहेबराव तांदुळकर (36, रा. कांचननगर जळगाव) आणि गोलू बंडू परदेशी (वय 26, रा कांचननगर) हे दोन्ही जण जागीच ठार झाले तर अजय सुनील वाल्हे (21), गणेश रवींद्र सोनवणे (23), परेश निंबा सोनवणे (26), चेतन रवींद्र मोरे (23), पवन रवींद्र मोरे (22), महेश गोविंदा सोनवणे ( वय 21), गजानन रमेश पाटील (24) व चालक विक्की अरूण चौधरी (25) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


