भुसावळ – पर्यावरण संवर्धनाचे महत्व लक्षात घेता भुसावळ ग्रामीण रुग्णालय परीसरात लायन्स क्लब भुसावळतर्फे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. सन 2016 पासून या परीसरात लायन्स क्लबमार्फत वृक्षारोपण करण्यात येत आहे.

आतापर्यंत शासकीय कंत्राटदार विनय सोनू बढे व कंपनीतर्फे वृक्षांचे संगोपन करण्यात आले आहे. दरम्यान, वृक्षारोपण कार्यक्रमास रुग्णालय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, लायन्स अध्यक्ष लायन डॉ.उमाकांत चौधरी, सेक्रेटरी किरण सरोदे, खजिनदार संजय चौधरी, डॉ.नरेंद्र भोलाणे, गोपाल अग्रवाल, डी.डी.चौधरी, डॉ.एस.एम.महाजन, शासकीय कंत्राटदार विनय बढे, विवेकानंद पाटील व सर्व लायन्स सदस्य उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.


