वरणगाव – नागपंचमीनिमित्त वरणगावसह परिसरातील सर्पमित्रांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान समाधान महाजन सर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी नागपंचमीनिमित्त सर्पाचे रक्षण करणाऱ्या वरणगावसह परिसरातील सर्पमित्रांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, धनगर समाजाचे अध्यक्ष शामराव धनगर, कार्यालय उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, मुस्लिम समाजाचे नेते जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, पं पं. स. सदस्य विजय सुरवाडे, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपशहर प्रमुख सुकदेव धनगर, निलेश ठाकूर, राजू धनगर, श्रीराम धनगर, नितीन पाटील, विनायक माळी, कृष्णा पुजारी, कुणाल महाजन, राहुल बंजारी, सागर वंजारी, सुनील शिंदे, अतुल पाटील, कृष्णा पाटील, राजू परसे, साजिद शेख, रोहित मुळे, योगेश भोई, सतीश चौधरी यांच्यासह शिवसेना परिवारातील सदस्य उपस्थित होते.
- या सर्पमित्रांचा झाला सत्कार
अमर सोनार, भूषण कोळी, अक्षय सोनार, भैय्या राजभर, स्वप्नील मोरे या सर्पमित्रांचा शाल श्रीफळ टोपी मान्यवरांच्या हस्ते देऊन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


