भुसावळ – येथील देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने अ.भा . वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. जगदेवरामजी उराँव यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाचे विमोचन रविवार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दुपारी चार वाजता अहिल्यादेवी कन्या शाळा आठवडे बाजार येथे होणार आहे

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रल्हाद पावरा तर प्रमुख वक्ते किशोर चौधरी देवगिरी प्रांत स्वीकृत सदस्य हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुषमा खानापूरकर या भुषविणार आहेत, पुस्तक विमोचन सोमनाथ वाघचौरे ( विभागीय पोलीस उप अधिक्षक भुसावळ) यांच्या हस्ते होणार आहे . या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन देवगिरी कल्याण आश्रम भुसावळच्या वतीने करण्यात आले आहे.


