(प्रतिनिधी )-
रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- सांतरागाछी दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशिल खाली दिलेल्यानुसार:
१. मुंबई – हटिया विशेष साप्ताहिक अतिजलद (६ फे-या)
02405 विशेष रविवार दि. १३.६.२०२१, २०.६.२०२१ व २७.६.२०२१ (३ फे-या) रोजी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १५.३० वाजता हटिया येथे पोहोचेल.
02406 विशेष शुक्रवार दि. ११.६.२०२१, १८.६.२०२१ व २५.६.२०२१ (३ फे-या) रोजी हटिया येथून १७.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला.
संरचना : १६ शयनयान आणि ४ द्वितीय आसन श्रेणी.
२. मुंबई – सांतरागाछी विशेष साप्ताहिक अतिजलद (६ फे-या)
02497 विशेष दि. ११.६.२०२१, १८.६.२०२१ व २५.६.२०२१ (३ फे-या) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.१५ वाजता सुटेल आणि सांतरागाछी येथे दुसर्या दिवशी १८.३५ वाजता पोहोचेल.
02498 विशेष बुधवार दि. ९.६.२०२१, १६.६.२०२१ व २३.६.२०२१ (३ फे-या) रोजी सांतरागाछी येथून १८.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर.
संरचना : १६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित असलेल्या 02405 आणि 02497 या अतिजलद विशेषचे बुकिंग विशेष शुल्कासह दि. ६.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होतील.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.




