भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर मास्क न घातलेल्या प्रवाश्यांसाठी विशेष मोहीम ; 2,32,750 दंड वसूल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड 19 महामारी चा संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क न घातलेल्या 2038 रेल्वे प्रवाश्यांना दंड आकारण्यात आला आहे. भुसावळ रेल्वे विभागाने मे महिन्याच्या कालावधीत फेस मास्क नसलेल्या लोकांकडून दंड म्हणून 2,32,750/ – इतका रक्कम वसूल केला आहे. प्रवाशांना दंडच्या पावती सोबत फेस मास्क देखील विनाशुल्क देण्यात येत आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे प्रवाश्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना साथीच्या रोगाची तीव्रताही समजेल.
कोरोना साथीच्या आजारामुळे सद्य परिस्थितीशी सामना करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करत आहे की त्यांनी स्टेशन परिसर आणि रेल्वे प्रवासा दरम्यान फेस मास्क अवश्य परिधान करावा . स्टेशन परिसर आणि गाड्यांमध्ये थुकू नका आणि अस्वच्छता करू नये .
रेल्वे प्रशासन प्रवाशांना आवाहन करते कि त्यांनी स्वछता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. आणि प्रवाशांना रेल्वे परिसर आणि ट्रेन मध्ये, कोविड १९ संबधित एसओपी चे पालन करावे.
कोरोना विषाणूचा प्रसार आणि संसर्गापासून आपण सर्वानी स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *