अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. निकम सर सेवानिवृत्त :


जामनेर –
धी. शेंदूर्णी सेकं. एज्यूकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी ता. जामनेर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. निकम सर यांचा सेवापूर्ती सोहळा दि. ३१ मे २०२१ सोमवार रोजी विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.
कार्यकमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे सचिव सतिष चंद्र काशिद यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका उज्वला ताई काशिद, जेष्ठ संचालक डी. टी. गायकवाड सागरमल वसतिगृह प्रमूख कैलास देशमूख, संस्थेचे माजी कर्मचारी गोविंद पांडे, संस्थेच्या शेंदूर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य उदार सर, वाकोद महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. चौधरी, लोहारा विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी सरोदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सागरमल जैन काकांनी आपल्या शेरो-शायरी ने कार्यक्रमात रंगत भरली. तसेच मान्यवरांनी निकम दादांच्या शैक्षाणिक व सामाजिक कारकीर्दबाबत माहिती सांगीतली. विद्यालयाच्या वतीने ए. एस. पाटील, व्ही. एल. सूरवाडे यांनी मुख्याध्यापकांना भावी निरोगी व दिर्घायुष्या बदद्ल शूभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती एस. बी. निकम दादा यांना मनोगतात थोडक्यात आठवानींणा उजाळा दिला यावेळी सर्वांचे सहकार्यमुळे सेवा घडली, यावेळी सर्वांचे ऋणात्मक आभार व्यक्त करतांना श्री निकम सर यांचा कंठ दाटून आला व नेत्र पाणावले .
कार्यक्रमास वाकडी गावातील स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व सर्वपदाधिकारी,वाकडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच एस. के. सूरवाडे सर्व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. भा.बौ.म वसंत लोखंडे, वाकडी पंचक्रोशीतील जेष्ठ रमेश गायकवाड, हस्तिमल शेठ, शब्बीर तडवी, मुरलीधर मूळे काका, तेजराव ठोंबरे मसूद शाह सरदार शाह तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक निकम दादा सरांचे आप्तेष्ट मंडळी तसेच पत्रकार ज्ञानेश्वर वंजारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका एस. डी. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस,. वाय. चौधरी सर यांनी केले तर आभार ए. डी. गायकवाड सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *