जळगाव जिल्ह्यात 1 जून रोजी १५७ नवे रुग्ण आढळले
जळगाव (प्रतिनिधी )-
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सतत घटत असून ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. दरम्यान, आज आज मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात १५७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ५७५ कोरोनामुक्त झाले आहे. बाधित रुग्णांसह मृताचा आकडा देखील कमी होऊ लागल्याने दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासात ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार १४२ इतकी झाली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३२ हजार ४४९ वर पोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५३५ वर पोचला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-२९, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-०३, अमळनेर-०४, चोपडा-२, पाचोरा-०६, भडगाव-०५ , धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-०३, जामनेर-०९, रावेर-०३, पारोळा-०४, चाळीसगाव-६०, मुक्ताईनगर-००, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.



