मुंबई – गोरखपूर आणि पुणे – दानापूर दरम्यानच्या रेल्वेगाड्यांच्या सेवांचा विस्तार ; मुंबई – गोरखपूर आणि पुणे – दानापूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:
अतिरिक्त विशेष ट्रेन 01367/01368 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (2 फे-या)
01367 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १४.५.२०२१ रोजी २१.४५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.
01368 विशेष गोरखपूर येथून दि. १६.५.२०२१ रोजी ११.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी २३.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, सतना, बांदा, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.
. 01495/01496 पुणे – दानापूर विशेष अतिजलद (४ फे-या)
01495 विशेष अतिजलद पुणे येथून दि. १५.५.२०२१ व १९.५.२०२१ रोजी (२ फे-या) १७.४० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल.
01496 विशेष अतिजलद दानापूर येथून दि. १७.५.२०२१ व २१.५.२०२१ रोजी (२ फे-या) ०५.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.
विशेष ट्रेनचा विस्तार
01355/01356 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (४ फे-या)
01355 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष सेवांचा विस्तार होऊन मंगळवार दि. १८.५.२०२१ व २५.५.२०२१ रोजी (२ फे-या) चालविण्यात येणार आहे.
01356 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष सेवांचा विस्तार होऊन गुरुवार दि. २०.५.२०२१ आणि २७.५.२०२१ (२ फे-या) रोजी चालविण्यात येणार आहे.
01493/01494 पुणे – दानापूर विशेष अतिजलद (२ फे-या ) 01493 पुणे – दानापूर विशेष अतिजलद सेवेचा विस्तार होऊन दि. १६.५.२०२१ रोजी चालविण्यात येणार आहे.
01494 दानापूर – पुणे विशेष अतिजलद सेवेचा विस्तार होऊन दि. १८.५.२०२१ रोजी चालविण्यात येणार आहे.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित असणारी विशेष गाडी क्रमांक 01367 साठीचे विशेष शुल्कासह बुकिंग यापूर्वीच खुले झालेले आहे. विशेष ट्रेन 01495 आणि 01355, 01493 या विशेष ट्रेनच्या वाढीव सेवांचे विशेष शुल्कासह दि. १४.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *