कोरोना पाठ सोडेना ; जिल्ह्यातील वाघ्या मुरळीसह कलावंतांवर उपासमारीची वेळ ; शासनाकडे मदतीची मागणी ; वाघ्या मुरळी महाराष्ट्र परिषदेतर्फे तहसीलदार यांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षा पासून मंदिरे व धार्मिक विधी व सणउत्सव बंद असल्याने वाघ्या – मुरळी व गोंधळी कलावंतांवर अत्यंत कठीन परिस्थिती ओढावली असून उपासमारीची वेळ आली आहे शासनाने यांचीही दखल घ्यावी व या कलावंतांना कुठल्या ना कुठल्या योजनेतून शासनानेआर्थिक दृष्ट्या मदत करावी अशी मागणी याकरीता येथील वाघ्या मुरळी महाराष्ट्र परिषदेतर्फे तहसीलदार यांना आज गुरुवार रोजी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख सौ, रेणुका बाई मुरळी आगलावे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद आहे की कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरीता प्रशासनातर्फे कडक निर्बंधासह लॉकडाउन सुरु आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षा पासून मंदिरे व धार्मिक विधी सणउत्सव बंद आहेत. तसेच लग्न समारंभ २० लोकात व अवघ्या दोन तासात होत आहे यामुळे वाघ्या – मुरळी व गोंधळी कलावंतांना कुठलाही कार्यक्रम नाही व शासनाची सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत नाही यामुळे ओघाने या गोंधळी कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे . दोन वर्षापासून कलावंतांना कुठलंही काम नाही कुठलाही रोजगार नाही कलावंतांची लेकरं बाळ सुद्धा उपासमारीची ही झळ सोसत आहेत, बरेचसे कलावंत आहेत की त्यांचा उदरनिर्वाह हा फक्त आणि फक्त यावरच अवलंबुन आहे तरी या कलावंतांना कुठल्या ना कुठल्या योजनेतून शासनाने आर्थिक दृष्ट्या मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे
उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र अहिरे , वाघ्यामुरळी परिषदेच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख रेणुका बाई मुरळी आगलावे , प्रकाश वाघ , जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील सरदार, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष घोडे, जिल्हा सल्लागार हनुमंत चव्हाण , विलास वाघ , जिल्हा कार्याध्यक्ष वसंत घोडे, जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर अहिरे, जिल्हा संघटक संजय ठाकूर , जिल्हा सचिव विठ्ठल महाजन , शाहीर जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील, जिल्हा सचिव परशुराम सुर्यवंशी, शाहीर व तमाम कलावंत कार्यकारणी व सदस्य यांनी केली आहे . यावेळी रेणुका आगलावे शिवाजी काटे , दिनकर पाटिल , शरद दाभाड़े , बंडू आरादी वाघ्या , शंकर बडगे निवेदन देते समयी उपस्थित होते .प्रसंगी शासनाचे सर्व त्रीसूत्री नियमांचे पालन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *