भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ नगरपालिकेत प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनानव्ये निवृत्त झाल्यानंतरचे निवृत्ती वेतन पहिल्यांदाच त्वरीत पहिल्या दिवशीच मिळाले .
भुसावळ पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
भुसावळ पालिकेत सन 2005 सालापासून जे कर्मचारी निवृत्त झाले होते, त्यांची सुद्धा निवृत्ती वेतन थकित होते .दरम्यान यातील काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. ही गंभीर बाब मुख्याधिकारी यांचे लक्षात आल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या गेल्या आठ महिन्यापासून 4 कोटी 95 लाखाची रक्कम दिल्याची माहिती भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चीद्रवार यांनी दिली.



