शहरातील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरला अनिल चौधरी मित्र परिवारतर्फे पाणी मशीन भेट ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दवाखान्यात दिवसेंदिवस बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे . अश्या परिस्थितीत या रुग्णांना गरम पाणी पीणे अत्यंत गरजेचे आहे . रुग्णांना थंड पाणी , गरम पाणी , व साधे पाणी वेळेवर मिळावे त्यांचे हाल होवू नये यासाठी येथील अनिलभाऊ चौधरी मित्र परिवार सब्जी मंडी यांचेतर्फे गरम,साध ,व थंड पाणी करण्याची (मिक्सवॉटर) मशीन शहरातील शहरातील ग्रामीण रूग्णालयातील कोवीड केअर सेंटरला सप्रेम भेट देण्यात आले .
याप्रसंगी डिंगबर पाटील, डॉ चाकूरकर, डॉ विक्रम सोनार, डॉ मयूर चौधरी , धिरज अनिल चौधरी, उमेश (भाचा) चौधरी , जिवन अहिरे , धिरज मराठे, किरण पाटील , प्रशांत चौधरी, हेमंत भारंबे, दीपक काटकर, राजु ठोसर ,यांचेसह अनिलभाऊ चौधरी मित्र परिवार सब्जी मंडई भुसावळचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *