मुंबई –
मध्य रेल्वे मुंबई विभाग रोड क्रेन वापरुन खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मर्यादित उंचीचे सबवे (एलएचएस) च्या आरएच गर्डर टाकण्यासाठी एकीकृत रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक संचालित करणार आहे. ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः

लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६१ (खडावली व वसिंद दरम्यान) आणि क्रमांक ६८ (आसनगाव व आटगाव दरम्यान) येथे आरएच गर्डरच्या उभारण्यासाठी. मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे याचा कालावधी व दिनांक १ व २ मे २०२१ (शनिवार / रविवार मध्यरात्र) रोजी ०२.१५ वाजेपासून ०७.२५ वाजेपर्यंत आहे .
ट्रॅफिक ब्लॉक विभाग : टिटवाळा ते आटगाव दरम्यान अप आणि डाऊन लाईन्स.
मेल / एक्स्प्रेस गाड्या रद्दीकरण
१. 01141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आदिलाबाद विशेष दि. ३०.४.२०२१ रोजी सुटणारी आणि
01142 आदिलाबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १.५.२०२१ रोजी सुटणारी.
२. 07057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सिकंदराबाद विशेष दि. २.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
07058 सिकंदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १.५.२०२१ रोजी सुटणारी.
३. 07618 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजुर साहेब नांदेड विशेष दि. २.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
07617 हुजुर साहेब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १.५.२०२१ रोजी सुटणारी.
मेल / एक्स्प्रेस गाडीचे वेळापत्रकाचे पुनःनिर्धारण:
02106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दि. १.५.२०२१ रोजी ३ तास (निर्धारित वेळ १४.४० वाजता) पुनःनिर्धारित करण्यात आली आहे.
अप मेल / एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
दि. २.५.२०२१ रोजी मुंबईकडे येणा-या खालील अप मेल / एक्स्प्रेस गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित केल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा ३ ते ५ तास उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
१. 01120 लखनौ – लोकमान्य टिळक टर्मिनस हॉलिडे स्पेशल
२. 01102 मंडुवाडीह – दादर हॉलिडे स्पेशल
३. 01237 नागपूर – मडगाव विशेष
४. 01052 हावडा – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
५. 02618 ह.निजामुद्दीन – एर्नाकुलम विशेष
६. 02138 फिरोजपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.
डाऊन मेल / एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
दि. २.५.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्या खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित करण्यात येतील.
१. 02129 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज विशेष
२. 02259 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा विशेष
३. 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष
४. 02136 मडगाव – नागपूर हॉलिडे स्पेशल.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
मुंबईकडे येणा-या खालील मेल / एक्स्प्रेस विशेष गाड्या जळगाव – सूरत मार्गे वळविण्यात येतील आणि कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी भिवंडी रोड स्थानकात थांबा देण्यात येईल.
१. 02104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल (दि. ३०.४.२०२१ रोजी सुटणारी)
२. 02810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दि. ३०.४.२०२१ रोजी सुटणारी)
ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांचे कामकाज:
ब्लॉक कालावधीत टिटवाळा ते कसारा विभागात/दरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध होणार नाहीत.असे
दिनांक: २९ एप्रिल २०२१
प्रप क्रमांक 2021/04/81
सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.


