भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे आरक्षित असणा-या उन्हाळी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार :

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष (८ फे-या)
01259 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २८.४.२०२१, २९.४.२०२१, ५.५.२०२१ व ६.५.२०२१ (४ फे-या) रोजी ०५.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्या दिवशी १४.०५ वाजता पोहोचेल.
01260 विशेष गोरखपूर येथून दि. २९.४.२०२१, ३०.४.२०२१, ६.५.२०२१ व ७.५.२०२१ (४ फे-या) रोजी १६.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः १ प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.
२) पुणे – गोरखपूर विशेष एकमार्गी (वन वे)
01473 विशेष पुणे येथून दि. २८.४.२०२१ रोजी २०.२० वाजता सुटेल व गोरखपूर तिसर्या दिवशी ०९.४० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान आणि ९ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : दिनांक २८.४.२०२१ रोजीच्या 01259 पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २७.४.२०२१ रोजी १७.३० वाजता सुरू करण्यात आले आहे आणि ट्रेन क्रमांक 01259 च्या उर्वरित फे-यांचे तसेच ट्रेन क्रमांक 01473 या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २८.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.


