भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील साकेगाव शिवारात भाजीपाला घेण्यासाठी दुचाकीने जाणार्या साकेगावच्या शेतकर्याला सिनेस्टाईलने दुचाकीवरुन आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दरोडेखोरांनी मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत लुटारूंनी 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला.
दरम्यान, तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एकाला ओळखले असून त्याचे नाव सोनू पांडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे
सोमवारी सकाळी झालेल्या घटनेनंतर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सहा.पोलिस निरीक्षक अमोल पवार, दशरथ राणे, विजय पोहेकर, विठ्ठल फुसे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.



