भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील चार खाजगी कोविड सेंटरची ग्रामीण व ट्रामा केअर रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने रविवारी अचानक तपासणी केली. वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकोरकर आदींच्या पथकाने झाडाझडती घेवून रुग्णांशीही संवाद साधला. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर होणार आहे.
या रुग्णालयांची तपासणी
भुसावळ शहरातील डॉ. राजेश मानवतकर यांचे समर्पण कोविड हॉस्पीटल, रिदम कोविड हॉस्पीटल, साईपुष्प कोविड हॉस्पीटल व मुस्कान कोविड हॉस्पीटलमध्ये रविवारी आरोग्य विभागाने सरप्राईज व्हिजीट करुन पाहणी केली. वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकोरकर यांच्यासोबत बाजारपेठ पेालिस ठाण्याचे मंगेश गोठला व पोलिस कर्मचारी यांनी प्रथम मानवतकर हॉस्पीटल गाठले. तेथे रुग्णांशी संवाद साधून हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांवर केले जाणार उपचार, अवाजवी बिलांच्या संदर्भातील तक्रारी आदींची पडताडणी केली. यासोबतच स्वच्छता, बायमेडीकल वेस्टची स्थिती, फायर सेफ्टी ऑडीट, ऑक्सीजन बेडची मंजूर संख्या व सध्या स्थितीत उपचार होत असलेल्या रुग्णांची संख्या आदींची माहिती घेत घेतली. कोविड सेंटरमध्ये 24 तास डॉक्टर, नर्सींग स्टॉप उपलब्ध आहे किंवा नाही? याची माहितीही घेण्यात आली. कोविड सेंटरमधील माहिती व आढळलेल्या त्रुटी आदींचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशानाकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान या तपासणीमध्ये आगामी काळातही सातत्य ठेवले जाणार आहे. रुग्णांच्या वाढीव बिले व इतर तक्रारींवरही प्रशासनाची नजर राहिल, अशी माहिती वैद्यकिय अधीधक्षक डॉ.मयुर चौधरी यांनी दिली.



