१८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय –


मुंबई –
राज्यात आता १८ वर्ष वयापुढील असलेल्या
सर्वांनाच कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १८ वर्ष वयापुढील लोकांना लस देणे आवश्यक असल्याचा सुर निघत होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर आज या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.
आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *