भुसावळ (प्रतिनिधी )-

तालुक्यातील साकेगाव शिवारातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाल मागील वर्षी जिल्ह्याधिकारी व पालकमंत्री व भुसावळ मतदार संघाचे आमदार यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सद्यस्थितीत या रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे .
रुग्नांची वाढती संख्या पाहता अनेक अडचणी समोर येत आहे . उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागणारा ऑक्सीजन यासह पुरेशी सामग्री साठा या सेंटरमध्ये अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णावर उपचार करणे अवघड झाले आहे .
अश्या अवघड व बिकट परिस्थितीत प्रामुख्याने ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नगरसेवक पिंटू कोठारी यांचेशी संपर्क साधला.
ही सर्व व्यथा कळल्यानंतर नगरसेवक पिंटू कोठारी यांनी त्वरीत ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला त्वरीत स्वखर्चाने मालवाहतूक रिक्षाने ऑक्सिजन सिलेंडरचा साठा व सुमारे दोन हजार हॅंडग्लोज उपलब्ध करून दिले आहे. यामुळे उपचार घेणारे रुग्णांना दिलासा मिळाला असून सर्व रुग्ण सुखरूप आहेत.
प्राणवायु सिलेंडरचा पुरवठा करणार – नगरसेवक निर्मल कोठारीं
ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले असून रुग्णालयाला आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडर लागल्यास पुरवठा करणार अशी ग्वाही नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी दिल्याने भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे .
समाजसेवेसाठी अहोरात्र झटणारा अवलिया नगरसेवक पिंटूभाऊ कोठारी –
कोरोना विषाणू पहिल्या टप्प्यापासून अर्थात सुमारे दीड वर्षापासुन समाजसेवेसाठी हा अवलिया सातत्याने अहोरात्र झटत आहे . धान्य वाटप ,मजुराणां गावी पोहचवणे , जेवन, दवाखाने उपचार , सैनिटर फवारणी , यासह शहरात रुग्णाचे सेवेसाठी मोफत रिक्षा, मोफत जलसेवा , अंत्यविधि करीता सर्वोतोपरी सहकार्य , यासह अनेक सेवा निरपेक्ष भावनेने करीत आहे . जळगांव जिल्हा सह भुसावळ तालुका व शहरात समाजसेवेने झपाटलेला हा अवलिया किंतु , परंतु , आदीं सबबी न सांगता स्वखर्चातुन रुग्नांच्या उपचारापासून अंत्यविधी पर्यतचे कामकाज सुरळीतपणे करीत आहे.


