भुसावळ –

जळगाव जिल्ह्यातील सध्या कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर हा वाढतो आहे आणि तशातच प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आणि अशा भयावह परिस्थिती मध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रे मेडीसी वर इंजेक्शनचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासत आहे. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णांसाठी बॅड सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही आहे. भुसावळ जळगाव जिल्ह्यातील ठिकाणी ऑक्सीजन प्लांट मंजूर झाले ते अपूर्ण स्थितीत आहे. शासकीय रुग्णालय सेंटरमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुद्धा कोरोना रुग्णांना व्यवस्थितआरोग्य सेवा मिळत नाहीयेत.जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय रुग्णालयांमध्ये अपुऱ्या शव वाहिका, रुग्णवाहिका असल्याने सुद्धा प्रचंड हाल होत आहेत.जळगाव जिल्ह्यातील सर्वच स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी यांची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे टेस्टिंग किट,पीपी इ किटस, औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीये. जळगाव जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालय ठिकाणी वेंटीलेटर नसल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेक कुटुंब यामुळे उघड्यावर आले आहेत उध्वस्त झाले आहेत. कोरोना रूग्णांच्या टेस्ट रिपोर्ट येण्यास आठ आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनावर व आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शासकीय रुग्णालयात विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी व तेथील रुग्णालयातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आणि म्हणून अशा या संकट काळी अशा,प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणुसकीची जपवणूक आणि जनहित साधलं गेलं पाहिजे यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी, सर्व औद्योगिक कंपन्यांनी, सर्व राष्ट्रीय कृत बँकांनी, आय आर सी टी सी रेल्वे,दीपनगर पॉवर प्लांट भुसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, वरणगाव, दीपनगर पॉवर प्लांट मधील कार्यान्वित असलेल्या सब वेंडॉर्शिप घेतलेल्या सर्व कंपन्यांनी त्यांना सामाजिक कार्यासाठी देय असलेला सीएसआर फंडातून भुसावळ सहजळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी,व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी, रुग्णवाहिका,शववाहिका, उपलब्ध करून देण्यासाठी, विद्युत दाहिनी, ऑक्सीजन प्लांट निर्मितीसाठी, सर्व शासकीय रुग्णालयातील अपुर्या आरोग्य सेवांच्या संपूर्ण पूर्ततेसाठी, रेमडिसिवर इंजेक्शनचा मुबलक साठा, तसेच मोठ्या प्रमाणात पी पी ई किट, उपलब्ध करून देण्यासाठी, व अत्याधुनिक कोविड सेंटर ठीक ठिकाणी उभारण्यासाठी, कोविल लसीकरणाच्या लसीचा स्टोरेज साठी आवश्यक असणाऱ्या डी फ्रिज , गोरगरीब रुग्णांचा सिटीस्कॅन वर होणारा खर्च टाळण्यासाठी मोफत सिटीस्कॅन मशिन एक्स-रे मशीन, वगैरे वरील सर्व गरजा त्यांच्या सीएसआर ( कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)फंडातून वरील सदर विविध सेवा जनहितार्थ उपलब्ध करून द्याव्यात व या संकट काळी स्वतः पुढे येऊनसरसावून पुढाकार घ्यावा यासाठी या सर्वांकडून सक्तीचा सी एस आर फंड जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी त्यांचेकडून उपलब्ध करून घ्यावा व या विविध आरोग्यविषयक समस्या सोडवाव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जळगाव यांना केलेली आहे. वरील सर्व क्षेत्रातील उद्योजकांनी बँकांनी कंपन्यांनी जर हा सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यास जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबेल आणि सर्वांना सर्व सोयींनी युक्तअश्या आरोग्य सेवा सुविधा मिळू शकतात अस मत शिशिर जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केलेला आहे.


