भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नगरसेवक तथा साईजीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल कोठारीं (पिंटू ) यांच्या कोरोना काळात गेल्या वर्षापासून अविरतपणे अहोरात्र
सुरू असलेल्या निस्वार्थ सेवेला भुसावळकरांनी सलाम केला असून वयोवृद्ध नागरिक आशिर्वाद देत आहे .
याच सेवेचा एक भाग म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून कोरोना बाधीत वा अन्य आजारी रुग्णांना दवाखान्यात जाण्या-येण्यासाठी अत्यंत अडचणी येत असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी त्वरीत रुग्णांना उपचार मिळावे यासाठी शहरात काही रिक्षा चालकांचा गृप तयार केला त्यानुसार सदर रिक्षा चालक रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे म्हणून १० एप्रिल ते ३० एप्रिल पर्यत मोफत सेवा देणार आहे
याकरीता नगरसेवक निर्मल कोठारीं उर्फ पिंटू यांनी पुढाकार घेतल्याने शहरवासियानी कोठारीं यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहे .
रिक्षा चालक मित्र मंडळी यांनी मिळून शहरातील रुग्णासाठी सर्वानुमते एक चांगला निर्णय घेतला असून रिक्षा चालक रुग्णांना दवाखान्यात मोफत नेणार तसेच उपचार झाल्यानंतर रुग्णाला घरी ही सोडणार आहे.शहरातील कुठल्याही कोपऱ्यातील अत्यावश्यक रुग्ण असो यासाठी दहा मोबाईल नंबर असलेला फलक (चार्ट) रिक्षेला लावण्यात आला आहे.त्यावरील नंबरवर संपर्क साधल्या नंतर दहा मिनिटात रिक्षा रुणांच्या सेवेसाठी हजर राहून त्यांना दवाखान्यात पोहचवून घरी सुद्धा सोडणार असल्याचे पिंटू कोठारीं यांनी सांगितले .

साईजीवन सुपर शॉप जामनेर रोडतर्फे अत्यावश्यक रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा
कॉल करा आणि रिक्षा तुमच्या दाराशी हजर
सदर सेवा साईजीवन सुपर शॉप तर्फे 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत सुरू राहील
संपर्क
नरेश 9730896667
सतीश 9049558684
गणेश 9158458500
चिकू 9834712509
योगेश 8390767181
दीपक 9370351605
कमलेश 9766363171
बाळू 9822310168
भानुदास 9823643620


