निर्यातीसाठी केंद्र सरकारला लस देऊ नका: प्रा.धिरज पाटील

भुसावळ (
पाकिस्तान भारताविरोधात गेल्या काही दशकांपासून दहशतवाद पोसत आला आहे. दररोज सीमेपलिकडून उखळी तोफा, गोळीबार ठरलेलाच. या दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. भारतीय जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतांना बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव व इतर राष्ट्रांना लस निर्यात केली आहे. तर कोरोनाच्या संकटात भारताने स्वत:ची गरज विसरून दहशतवादी पाकिस्तानला कोरोना लसीचे तब्बल ४.५ कोटी डोस निर्यात करणे म्हणजे केंद्र सरकारची चूक ठरेल. भारतीय नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपण निर्यातीसाठी केंद्र सरकारला लस देऊ नका असे निवेदन पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट कंपनीच्या संचालक मंडळाला शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे.
देशात लसीचे डोस संपल्यामुळे शहरातील लसीकरण बंद करण्यात आले आहेत. नवीन डोस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागो स्पष्ट केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मृत्यूदर वाढला असून संसर्ग वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नियम पाळले जावेत, मात्र भारतीय नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यावर निर्यात करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *