भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरांमध्ये विना मास्क भाजीविक्रेते व विनाकारण वीना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली

कोरोना रुग्णांची संख्या दिवसें दिवस जास्त प्रमाणात वाढत आहे त्यातच मृत्यूचे संख्येच्या प्रमाणाने कळस गाठला आहे. वारंवार नागरिकांना महत्वपूर्ण सूचना देवूनही नागरिक वीना मास्क शहरांमध्ये फिरत आहेत . नियमांचे उल्लंघन करीत आहे म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे आयपीएस पोलीस अधिकारी आर्चित चांडक व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजारांमध्ये विना मास्क नागरिक व भाजीपाला विक्रीत्यांवर दोनशे रुपये ते पाचशे रुपये पर्यंत दंड आकारून कारवाई केली आहे .


