वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समिती पथकाने भुसावळात केली पाहणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती गुरुवार रोजी जिल्ह्यात दाखल झालेली आहे, या अनुशंघाने
भुसावळ येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरासाठी गठीत केलेल्या तज्ञ पथकांमधील एक पथक शुक्रवार रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने आज भुसावळ शहरात भेट देऊन कोविड सेंटरसहस्वॅब कलेक्शन सेंटर, कंटेन्मेंट क्षेत्र आदि ठिकाणी भेटी देऊन आढावा घेणार असून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देत पाहणी केली. तसेच कोरोना बाधीत रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणी आटोपून पथक मार्गस्थ झाले.

  सदर  पाहणी  अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे  सादर करणार असल्याचे यावेळी  सांगितले.जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग तीव्रतने वाढत आहे. देशातील अन्य राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने असे ५० जिल्हे निश्‍चित करुन तेथील आढावा, उपाययोजनांच्या दृष्टीने ५० पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात पाच ते सात दिवस मुक्कामी असलेल्या या पथकाने ‘फिल्ड व्हीजिट’ केली आहे. या पथकाने शुक्रवार रोजी सकाळी ट्रामा केअर सेंटर आणि शिवदत्त नगरातील लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच

त्यांचे सोबत आदीं प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन तेथील क्वॉरंटाइन परिवारातील सदस्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पथकासह जिल्हा आरोग्य अधिकारी जिप डॉ जमादार होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *