हावडा एक्सप्रेसला ट्रकने दिली जोरदार धडक, प्रवासी जखमी ;


अमळनेर ( प्रतिनिधी ) –
हावडा एक्सप्रेसला आज सकाळच्या सुमारास ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली.
अमळनेर ते धरणगाव स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळांचे काम सुरू आहे. या अनुषंगाने भोणे गावाजवळ आज सकाळी काम सुरू होते. यातच अमळनेर कडून हावडा एक्सप्रेस आली असता रूळांच्या कामाची सामग्री घेऊन आलेल्या ट्रकने एक्सप्रेसला टक्कर दिली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत.
सुदैवाने, मोठा अपघात टळला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून क्रेनच्या मदतीने ट्रकला तेथून बाजूला केले आहे. यानंतर हावडा एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *