भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत
सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सौ.सुवर्णा नितीन कोळी यांची उमेदवारी माजी उमेदवार संतोष चौधरी यांनी निश्चित केली आहे .
तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत हे आरक्षण हे एस टीं महिला म्हणून शासनातर्फे घोषित करण्यात आली
म्हणून सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सौ.सुवर्णा नितीन कोळी यांची उमेदवारी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातर्फे निश्चित करण्यात आली याावेळी

सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला .
प्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष नाना निसाळकर, विशाल रवींद्र खेडकर, कल्पना विनायक वासनिक, निर्मलाताई रघुनाथ घोडेस्वार, पुष्पाताई नथू जैन, आशाबाई लिंबाजी हुसळे , पल्लवी विक्रांत वाघमारे व कल्पना अजय मोरे यांच्यासह जनाधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नितीन धांडे, राहुल घोडेस्वार, आनंद घोडेस्वार, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक दादा वासनिक,माजी नगरसेवक भिमाजी गोडी, कुणाल रवींद्र खेडकर, सुरेश पैलवान, आनंद दादा हुसळे व संख्या कंडारी गावातील रहिवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .


