भुसावळ (प्रतिनिधी ) –
सोमवार दि. ०१फेब्रूवारी ते रविवार २८ फेब्रूवारी २०२१ असा
संपूर्ण महिन्याच्या कालावधीसाठी “ योगासन प्राणायाम वर्ग” कॉसमॉस बँकेच्या वरील
हॉल मधे, गरूड प्लॉट, देवडा ड्रेससमोर, सातारे ब्रिजच्या बाजूला, भुसावळ येथे
सकाळी ६ ते ७ या वेळेत सुरु होत आहे.
या योगवर्गात सुर्यनमस्कार, महत्वाची योगासने, बंध, शुध्दिक्रिया, प्राणायामा चे
प्रकार, हास्यकला इ. प्रक्रिया शिकवून करवून घेतल्या जातील. हा योगवर्ग योग शिक्षक
श्री. प्रणव बळेल, व सौ. मयुरी बळेल यांचे सहकार्याने प्रख्यात योगतज्ञ प्रा. बळेल सर
(योग पंडित) यांच्या उपस्थितीत घेतला जाईल, सहाय्यक शिक्षक म्हणून अशोक मनवानी, व किशोर गायकवाड हे मदत करीत आहेत. या वर्गामध्ये प. स्वामी
रामदेव महाराज यांचे प्राणायाम पॅकेज व कोरोना स्पेशल योगासने ही शिकवून करवून
घेतले जातील. या योगवर्गात सरावासाठी येणाऱ्या सर्व जुने स्त्री पुरुष साधकांनाही प्रवेश
मिळेल.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रा. वसंत बळेल, प्रसाद पॅलेस, कुळकर्णी
प्लॉट, वकील गल्ली, भुसावळ मो. नं. ९४२२२७६१५० यांच्याशी संपर्क साधावा. किंवा
परस्पर कॉसमॉस बँकेच्या हॉल मधे १ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता हजर राहावे असे
आवाहन बॅच मॅनेजर संदीप जामठे व श्री दिक्षीत यांनी केले आहे.



