भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मॉडर्न रोडवरील मनीष मॉलजवळून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना 20 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार विलास रतीलाल पवार (रा.रामदेव बाबा मंदिर, रींग रोड, भुसावळ) यांनी 20 रोजी मनीष मॉलजवळ दुचाकी (एम.एच.19-218) लावली होती. कामानिमित्त ते बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लांबवली. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल अडकमोल करीत आहेत.



