सुधीर तायडें व निलेश पाटील यांना उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशस्ती प्रमाणपत्र; राष्ट्रीय मतदार दिनी तहसीलदार दिपक धिवरेंच्या हस्ते गौरव ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक 25 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुधीर रामदास तायडे व निलेश पाटील यांना “मतदान केंद्रस्तरीय अधिकारी” म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरीचे फोटो फ्रेम प्रमाणपत्र देवून तहसीलदार दिपक धिवरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी काही नवमतदारांचे मतदानकार्ड व पुष्प देवून लोकशाहीच्या प्रवाहात स्वागत करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार घुले मॕडम व नायब तहसीलदार इंगळे हे सुध्दा कार्यक्रमाला उस्थित होते. मार्गदर्शन करतांना तहसिलदार दिपक धिवरे म्हणाले,” युवाशक्ती आपल्या देशाचे भवितव्य असून त्यांना वयाचे १८ वर्ष पुर्ण होताच मतदानाचा आधिकार मिळवून दिला गेला पाहीजे. लोकशाही सशक्तीकरणासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून प्रत्येक जण आपले कार्य चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न करत असतो.
सत्कारपर मनोगतात सुधीर तायडे यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे कार्य उल्लेखनियच आहे. निवडणूक विभागाकडून माझा करण्यात आलेला गौरव हा माझा वैयक्तिक गौरव नसून आपल्या सर्वांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात आपल्या सर्वांच्या सांघिक कार्याचाच हा गौरव आहे असे समजा. आपआपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीचा संपर्क मोबाईल क्रमांक असलेला व्हाॕटसअॕप ग्रुप तयार करा. जेणेकरुन मतदारांच्या अडचणी समजून घेणे व नवमतदार नोंदणीसह, निवडणूक आयोगाचे विविध संदेश मतदारांपर्यंत पोहचवणे सोयीचे होईल.
कार्यक्रमाला योगेश मुस्कवाड, अमोल पाटील, सचीन पाटील इ. सह महसूलचे कर्मचारी व नवमतदार उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *