वराडसीमला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था, भारत जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने वराडसीम ग्रामपंचायतीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहाने झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ‘केसावर फुगे फेम’ अभिनेता गायक अण्णा सुरवाडे, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष लखन सजोले उपस्थित होते. वराडसीम येथील लखन सजोले यांना ‘राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार’, मनिषा शिंदे यांना ‘पक्षी मित्र पुरस्कार’, गजानन क्षीरसागर यांना ‘रुग्ण मित्र पुरस्कार’, प्रदीप पाटील यांना ‘पक्षी मित्र पुरस्कार’, दिनेश पालवे यांना ‘पक्षी पुरस्कार’, ध्रुवास राठोड यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘, विजय सुर्यवंशी यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ व ‘राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार’ जळगाव जिल्हा तिसरा क्रमांक सन्मान पत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसंगी वराडसीम ग्रामपंचायत सरपंच गीता खाचणे, उपसरपंच प्रकाश ठाकूर, भुसावळ तालुकाध्यक्ष पवन बाक्से, उपाध्यक्ष राजु राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष नितीन जोगी, बापू सोनवणे, संजय सजोले, प्रतिभा जंगले, ज्योत्स्ना पाटील, लोककलावंत मंडळ, ग्रामपंचायत सदस्य व पर्यावरण संस्था सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *