राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरासह विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. मतदानाचे महत्व आणि सशक्त लोकशाहीचे फायदे यांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. शपथ पत्राचे वाचन डॉ.दयाघन राणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जी.पी.वाघूळदे यांनी केले. प्रसंगी रा.से.यो.अधिकारी डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.निर्मला वानखेडे, एरीया कोआर्डीनेटोर प्रा.ए.आर.सावळे, डॉ.आर.बी.ढाके, डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी. चौधरी, प्रा.आर.डी. भोळे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.अनिल नेमाडे, डॉ.जे.पी.सरोदे, डॉ.शोभा चौधरी, प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा.डॉ.डी.एस.राणे यांनी मानल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *