भुसावळ येथे पेपर कोलाज चित्रांद्वारे वृक्ष संवर्धनाचा संदेश ! स्नेहयात्री प्रतिष्ठान व आर्टिस्ट व्हिजन फौंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी) :
वृक्षवेलींशिवाय मानवाला निरोगी आणि आनंदी जगणे शक्य नाही, हा विचार बालमनात रुजवण्यासाठी भुसावळ शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठान (रीडर्स क्लब) आणि आर्टिस्ट व्हिजन फौंडेशन (AVF) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय कलाशिक्षक व AVF चे संस्थापक श्री. राजेंद्र जावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी पेपर कोलाज चित्रांच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला.
संत तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या अभंगाचा निसर्ग व विज्ञानवादी विचार कृतीत आणत, लहान पिढीच्या मनात पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
*या प्रसंगी उपस्थित प्रा. डॉ. जतीन श्री. मेढे यांनी श्री. राजेंद्र जावळे सरांच्या या सामाजिक व कलात्मक उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "समाजाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी सातत्याने धडपडणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक लाभणे ही आनंदाची बाब आहे. अशा सप्तरंगी उपक्रमांमुळे जीवनात इंद्रधनुष्यासारखा आनंद निर्माण होतो."
*भुसावळ शहरातील वृक्ष प्रेमी  सेवा निवृत्त शिक्षक श्री. नाना पाटील यांनी 25 डेरेदार पसरणारे आणी दाट सावली देणारे वृक्ष व पुस्तकं वाचक समुहाला स्व हस्ते वाटप केली.
ही सर्वं वृक्ष (रोप ) शामा मुखर्जी उद्यानात योग्य ठिकाणी स्नेह यात्री व रीडर्स क्लब सद्यस्यांचे हस्ते वृक्षा रोपण करण्यात येणार आहे.
    या उपक्रमाला शहरातील बालकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाना पाटील सर, नितीन पाटील सर (कलाशिक्षक रेल्वे स्कूल ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
स्नेहयात्री प्रतिष्ठान (रीडर्स क्लब) आणि आर्टिस्ट व्हिजन फौंडेशन (AVF), भुसावळ आयोजित 'पेपर कोलाज चित्र व वृक्ष संवर्धन प्रबोधन' उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.