भुसावळ (प्रतिनिधी )-येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, हरवींदर सिंग थेठी आणि राजीव शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष संजय चापोरकर यांनी मागील वर्षातील रोटरी क्लबच्या कार्याचा आणि विविध सामाजिक उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर वाचन करून दाखवला. त्यानंतर मावळते अध्यक्ष संजय चापोरकर यांनी नूतन अध्यक्ष मदन बोरकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. तसेच, मावळते सेक्रेटरी रत्नाकर क्षीरसागर यांनी नूतन सेक्रेटरी गोपीनाथ अय्यर यांच्याकडे आपल्या पदाची सूत्रे सोपवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित मान्यवर हरवींदर सिंग थेठी,राजीव शर्मा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि नूतन अध्यक्ष मदन बोरकर यांनी क्लबच्या भावी वाटचाली संदर्भात आणि सामाजिक बांधिलकीवर मार्गदर्शन केले. या वेळी राधेश्याम लाहोटी,जी.आर. ठाकूर,रजनी सावकारे,सरला बोरकर,उदय बोरकर, इश्वर बोरकर,श्वेता बोरकर,नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे,नाना पाटील,गणेश सोनवणे,हिरामन मोरे,संदीप चव्हान, सुनिल गायकवाड,सतिश झांबरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले, तर आभार मंगला पाटील यांनी मानले.
फोटो कॅप्शन – रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ प्रसंगी नूतन अध्यक्ष मदन बोरकर यांना अध्यक्ष पदाची सूत्रे देताना संजय चापोरकर सोबत डावीकडून रत्नाकर क्षीरसागर,हरविंदरसिंग थेठी,संजय सावकारे, राजीव शर्मा,गोपीनाथ अय्यर आदी.



