हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची नियमित सेवा सुरु

   भुसावळ (प्रतिनिधी )  मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या दोन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची नियमित सेवा सुरू करण्यात येत आहे. नियमित सेवेचा प्रारंभ खालीलप्रमाणे होईल:

* गाडी क्रमांक 17667 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : दिनांक 08.07.2026 पासून
* गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस : दिनांक 09.07.2026 पासून
* गाडी क्रमांक 17665 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : दिनांक 13.07.2026 पासून
* गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस : दिनांक 14.07.2026 पासून

नियमित फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
(A)	गाडी क्रमांक 17666 / 17665 लोकमान्य टिळक टर्मिनस - हजुर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस
गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - हजुर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी १६.३५ वाजता सुटेल आणि हजुर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता  पोहोचेल. 

गाडी क्रमांक 17665 हजुर साहिब नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस हजुर साहिब नांदेड येथून दर सोमवारी २१.१५ वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता  पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा. 

(B) गाडी क्रमांक 17668/ 17667 लोकमान्य टिळक टर्मिनस - हजुर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस
गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - हजुर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी १६.५५ वाजता सुटेल आणि हजुर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. 

गाडी क्रमांक 17667 हजुर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस हजुर साहिब नांदेड येथून दर बुधवारी २१.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता  पोहोचेल.

 थांबे: कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.

 दोन्ही गाड्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण:- गाडी क्रमांक 17666 आणि गाडी क्रमांक 17668 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर दिनांक ०८.०७.२०२६ रोजी सुरू होईल.