९२.७५ टक्के गुणांसह ऐतिहासिक यश; जैन समाजासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
भुसावळ (प्रतिनिधी)- पाचोरा येथील रहिवासी साक्षी सुरेश मुनोत (जैन) हिने सी.ए. (CA) फाउंडेशन परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक (All India Rank-1) मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत तिने ९२.७५ टक्के गुण मिळवत संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे पाचोरा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, परिसरात आणि जैन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच साक्षीच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळालेल्या या यशाबद्दल नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. साक्षीच्या या उल्लेखनीय यशानिमित्त जैन समाजातील अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी तिची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यामध्ये निर्मल कोठारी, राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोटेचा, जयंतीलाल सुराणा, गौतम चोरडिया, विनोद मेहता, प्रा. दिनेश राठी, ब्रिजेश लाहोटी, कांतिलाल चोरडिया, शरद नहार, दिलीप नहार, सुदर्शन नहार, राहुल नहार, संतोष नहार, अनिल लोढा, कल्पेश बंब, शिरीष नाहाटा, गलूदास छाजेड, विशाल चोरडिया, विजय चोरडिया, डॉ. सुदेश सांखला, डॉ. मयूर चोरडिया, रविंद्र निमाणी, विनोद चोरडिया, संदीप देवडा, गुड्डु अग्रवाल, सनी चोरडिया, अतुल ताथेड, मुकेश चोपडा, सी.ए. सिद्धार्थ चोपडा, सुगमचंद कोटेचा, अजय गादिया, अजय जैन, राजेश सुराणा, संजय सुराणा यांच्यासह अनेक जैन बांधवांनी साक्षीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. साक्षीच्या या यशामुळे पाचोरा आणि भुसावळ परिसरातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, तिच्या या कामगिरीचा सर्वत्र गौरव केला जात आहे.


