फैजपूरच्या प्रमोद पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रात जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

भुसावळ (प्रतिनिधी )- कळमोदा रहिवासी व हल्ली फैजपूरातील राहणारे प्रमोद लक्ष्मण पाटील यांची पुण्यातील चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या संशोधन व विकास विभागात जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. प्रमोद पाटील हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत मागील २४ वर्षांपासून कार्यरत आहे. प्रमोद पाटील हे जळगाव जिल्हा परिषद शाळेतील निवृत्त शिक्षक लक्ष्मण रामू पाटील यांचे चिरंजीव आहेत. आपल्या मेहनत, प्रामाणिकपणा, तांत्रिक ज्ञान आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर त्यांनी ही पदोन्नती मिळवली आहे. या पदोन्नतीबद्दल त्यांच्यावर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ते आपल्या कार्यातून कंपनीचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.