भुसावळ येथे श्रुतपंचमी ( ज्ञानपंचमी) पर्व महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ ( प्रतिनिधी ) भारतवर्षात दिगंबर जैन धर्मियांचा श्रुतपंचमी. ज्ञानपंचमी उत्सव सर्वत्र माजरा होत आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शहरात सुध्दा दिगंबर. जैन मंदीर येथे शुक्रवार दिनांक १९ जून रोजी श्रृतपंचमी-ज्ञानपंचमीपर्व साजरा होणार आहे. सकाळी भगवंताचा महामस्तका अभिषेक, पूजाअर्चा आरती नंतर जिनवाणी हॉलमध्ये सकाळी ७ ते ८ णमोकार महामंत्र जाप श्रृतविधान, ध्वजवंदना नंतर श्रुतविधान दिंडी गांधी चौकश्री. पार्श्वनाथ है. जैन मंदीर येथून ग्रंथदिंडी मिरवणूक निघणार आहे. प्रमुख रस्त्यावरून ही ग्रंथदिंडी मरीमाता मंदीर मार्ग आठवडे बाजारातील भगवान महावीर दिगंबर जैन मंदीर येथे ' येवून जिनवाणी हॉलमध्ये दिंडी चे समेत रूपांतर होईल. प्रथम ध्वजवंदना नंतर भजन, गीतगायन प्रमुख वक्ते यांचे भाषण महाभारती होऊन प्रसाद वाटप होईल तरी मोठ्या संख्येने जैन भाविकांनी धर्मलाभ घ्यावा असे आवाहन जैनट्रस्टी बोर्ड व जिनवाणी अभिरूची साहीत्य मंडळा तर्फे आवाहन करण्यात आले आहे.