नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद असल्यामुळे काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

भुसावळ (प्रतिनिधी)- नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद असल्यामुळे कोचिंग परिचालनावरील परिणामांचा कालावधी 52 दिवसांवरून वाढवून 61 दिवस करण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वी लागू करण्यात आलेली व्यवस्था 30 मे 2026 ते 07 जून 2026 या कालावधीसाठी अतिरिक्त 9 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

या कालावधीत खालील गाड्यांच्या संचालनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत:

1) गाडी क्रमांक 11203 नागपूर–मडगाव एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 30.05.2026 ते 06.06.2026 या कालावधीत ही गाडी नागपूर स्थानकाऐवजी अजनी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल.
2) गाडी क्रमांक 11204 मडगाव–नागपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 31.05.2026 ते 07.06.2026 या कालावधीत ही गाडी अजनी स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल व नागपूर स्थानकापर्यंत जाणार नाही.

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत स्थिती व वेळापत्रकाची माहिती अवश्य तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.