भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी, चालक फरार

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भरधाव बोलेरो वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 07 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 03:30 वाजता निंभोरा बु. गावाच्या गेटसमोर, दीपनगरकडे वळणाऱ्या रोडवर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर घडली.

याबाबत रणजित सुरेश कुशवाह (वय 45, व्यवसाय हातमजुरी, रा. जयसिंगपुरा, ता. बुरहानपूर, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बोलेरो वाहन क्रमांक MH-19-EG-4003 च्या अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित कुशवाह हे त्यांच्या पत्नी सरलाबाई रणजित कुशवाह यांच्यासह हिरो HF डिलक्स (क्र. MP-68-MA-9294) या दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी दीपनगर ते वरणगाव रोडवर मागून भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा बोलेरो (क्र. MH-19-EG-4003) या पांढऱ्या रंगाच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रणजित कुशवाह व त्यांच्या पत्नी जखमी झाले.

अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका/1280 संदीप बडगे करीत आहेत.

..