भुसावळ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी) – नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी/मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेच्या निकालात भुसावळ येथील कला, विज्ञान व पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या उज्ज्वल परंपरेला यंदाही कायम राखले आहे.

महाविद्यालयाचा एकूण निकाल समाधानकारक लागला असून विज्ञान शाखेचा 98.05 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.52 टक्के तर कला शाखेचा 75.90 टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेत अत्तरदे गुंजन पंकज हिने 93.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. भारंबे रागिनी अजय (91.67 टक्के) हिने द्वितीय, तर भट तनश्री श्रीराम (88.83 टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

वाणिज्य शाखेत जैन आयुष नेमीचंद (94.33 टक्के) प्रथम, कुकरेजा प्रांजल नरेश (91.83 टक्के) द्वितीय आणि अग्रवाल गोपाळ नंदकिशोर (91.33 टक्के) तृतीय क्रमांकावर राहिले.

कला शाखेत कांग मुस्कान कौर करतार सिंग आणि बद्रे प्रशंसा निता (दोघी 91.83 टक्के) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. पाटील अस्मिता ज्ञानेश्वर (90.83 टक्के) द्वितीय, तर तल्हारी श्रुती सुनिल (87.67 टक्के) तृतीय ठरली.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी पुढे वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रगती करतील, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थी सी.ए. व सी.एस. सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाटचाल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन महेश देविदास फालक, सेक्रेटरी विष्णु श्रावण चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ. भोजराज हनुमंत बऱ्हाटे, उपप्राचार्य योगेश एम. पाटील, पर्यवेक्षक स्वाती ए. पाटील, समन्वयक शैलेश बी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.