भुसावळ (प्रतिनिधी) – येथील प्रतिष्ठा महिला मंडळाने यंदाही आपली प्रतिष्ठा जतन करीत अक्षयतृतीयेच्या निमित्ताने “आठवणीतले माहेर” या संकल्पनेवर आधारित एक खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भुसावळ येथील बालाजी लॉन येथे पार पडणार आहे.

हा उपक्रम सर्व माता-भगिनींसाठी खुला असून पारंपरिक आणि मनोरंजक आकर्षणांनी सजलेला आहे. झोके, बैलगाडी तसेच महिलांची आवडती पैठणी (3 लकी ड्रॉद्वारे) ही विशेष आकर्षणे असणार आहेत.
कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. “सर्वोत्तम भारतीय नववधू” (बेस्ट इंडियन ब्राईडल) स्पर्धेत सहभागी महिलांना भारतातील कोणत्याही राज्यातील नवरीची वेशभूषा सादर करता येईल. समूह नृत्य स्पर्धेसाठी किमान 4 महिलांचा गट आवश्यक असून वेळ मर्यादा 4 ते 5 मिनिटे ठेवण्यात आली आहे. नृत्याची थीम अक्षय तृतीया, देशभक्ती किंवा महाराष्ट्र दिनावर आधारित असावी.
याशिवाय भारतातील महान स्त्रियांच्या वेशभूषेवर आधारित स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा यांचाही समावेश आहे. निबंधासाठी 1500 ते 2000 शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून 29 एप्रिलपर्यंत व्हॉट्सअॅपद्वारे राजश्री देशमुख यांना 08888389793 निबंध सादर करावा .
स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपली नावे. अनिता आंबेकर 07304434949/ 09623037418 ,सौ सोनल महाजन ,09130838468 ,सौ जयश्री चौधरी, 09158823288 ,सौ मनीषा काकडे ,07387187060 ,सौ वैशाली सैतवाल , 09511886655 सौ राजश्री बादशाह ,08600783976 स्पर्धांमध्ये भाग न घेता पण तुम्ही कार्यक्रमा दिलेल्या संपर्क क्रमांकांवर नोंदवावीत. स्पर्धेत भाग न घेता देखील कार्यक्रमाचा आनंद घेता येणार असून कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आकर्षक बक्षिसे आणि उत्साही वातावरणामुळे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


