भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभागातील पारस -गायगाव – अकोला दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गांवर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शन कामाच्या संबंधात नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामासाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. दिनांक 23.04.2026 (गुरुवार) रोजी या कामामुळे प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम पुढीलप्रमाणे असेल:
दिनांक 23.04.2026 रोजी गाड्याचे रद्दीकरण -:
१) गाडी क्रमांक १११२१ भुसावळ ते वर्धा मेमू
२) गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा ते भुसावळ मेमू
३) गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ बडनेरा मेमू
४) गाडी क्रमांक १११२२ वर्धा ते भुसावळ मेमू

दिनांक 23.04.2026 रोजी विभागामध्ये गाड्यांचे नियमन
१) गाडी क्रमांक २०८२० ओखा -पुरी एक्सप्रेस शेगांव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान ०२ तास २५ मिनिटे नियमन करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक ११०४० गोंदिया -कोल्हापूर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान ०२ तास २० मिनिटे नियमन करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १२४८५ हजुर साहिब नांदेड -श्री गंगा नगर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान ०२ तास नियमन करण्यात येईल.
रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आले आहे की, त्यामुळे होणारा गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.


