दीपनगरात पुन्हा उफाळला राखेचा प्रश्न; कामगार संघटनेच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी :          

  भुसावळ( प्रतिनिधी )तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील श्रमिक सेवा कामगार संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष यासिन खान पठाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.सदर घटना १४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.                                                       

   याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यासिनखान पठाण हे १४ एप्रिल रोजी रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक आटोपून संघटनेच्या कार्यालयात त्यांच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करीत असताना संशयीत आरोपी लकविंदरसिंग जसविंदसिंग संन्सोये रा.निंभोरा बुद्रुक अक्षय सुरेश पाटील रा.निंभोरा बुद्रुक  यांनी  महेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून पठाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली या बाबत भुसावळ तालुका पोलिसात यासिन पठाण यांच्या फिर्यादीवरून तीन जणांना विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासिन पठाण यांच्या संघटनेचे प्रतिनिधी त्यांच्या बल्कर मध्ये ओव्हरलोड राख भरु देत नाही.तुम्ही त्यांना सांगा नाही तर तुम्हाला जीवे ठार मारणार अशी धमकी दिली याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढील तपास ल तालुका पोलीस करीत आहेत.