भुसावळात नशामुक्त भारत अभियान चा जागर..!५०० युवकांनी केला नशा मुक्ती चा संकल्प !युवकां मधील वाढती व्यसनाधीनता चिंतेचा विषय -लोककलावंत विनोद ढगे

      

भुसावळ (प्रतिनिधी ) – आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही देशा समोरील सर्वात मोठी गंभीर समस्या असुन व्यसन मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी साठी संघटित प्रयत्नाची गरज असल्याचे प्रतिपादन लोककलावंत शाहीर विनोद ढगे यांनी केले

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालया अंतर्गत देशभर नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे या अभियानास पाच वर्षे पुर्ण झाले असून या वर्षपुर्ती च्या निमित्ताने व्यसनमुक्ती जनजागृती पर विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभरात करण्यात येत आहे

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ येथे करण्यात आले होते या अभियाना अंतर्गत पथनाट्य, चित्रप्रदर्शन, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या

या प्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम एस राजपूत गटनिदेशक एल आर पाटील, सुनिल गाजरे श्री तायडे जे झेंडे,समाज कल्याण कार्यालय अधीक्षक टी एस तडवी, नशा मुक्त भारत अभियान समन्वयक चेतन कुमार साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिपक कोळी यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाड्मय पुस्तक देऊन करण्यात आले

या प्रसंगी नशा मुक्त भारत अभियान अभियानांतर्गत पाचशे युवक युवतींनी नशा मुक्त भारताचा संकल्प केला व शपथ घेतली

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा संस्थे चे शाहीर विनोद ढगे व त्यांचे सहकारी सचिन महाजन अवधूत दलाल,मोहीत पाटील,देवराज बोरसे दर्शन गुजराथी संतोष चौधरी यांनी “नशा करी दुर्दशा ” हे पथनाट्य सादर केले

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिशा गाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले